मेष : सप्ताहात व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. तुमच्या यशाची कमान वाढत जाईल. व्यवसायात कामे वेळेत पूर्ण होतील पैशाची तजवीज होईल. नोकरीत वेळेचे भान ठेवून कामे पूर्ण करण्यावर भर राहील. वरिष्ठांच्या सल्ल्याचा मान राखून त्याप्रमाणे कृती कराल. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात महिलांचा कामाचा उरक दांडगा असेल. हौसेमौजेखातर खर्च कराल. कलावंत, खेळाडूंना कायम उत्तम यश मिळेल.
वृषभ : सप्ताहात पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून विशेष लाभ होतील. व्यवसायात कामांना वेग येईल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. बेकार व्यक्तींना कामधंदा मिळेल. घरात महिलांनी संयमाने वागून कामे उरकावीत. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. नवीन खरेदीचे बेत ठरतील. प्रकृतीमान सुधारेल. साहित्यिक, विचारवंत यांना विचारांची योग्य दिशा मिळेल.
मिथुन : शुभग्रहांची साथ मिळाल्याने कामात विस्तार करून फायदा मिळवाल. व्यवसायात ओळखीमुळे नवीन कामे मिळतील. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. नोकरीत नवीन अनुभव येतील. अनपेक्षित चांगली कामे होतील. प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. घरात कौटुंबिक प्रश्न धसास लागतील. महिलांना मनोबल वाढवणाऱ्या प्रिय घटना घडतील. खेळाडूंना अपेक्षित यश मिळेल. कलाकार, खेळाडू राजकारणी व्यक्तींना मान मिळेल.
कर्क : “थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीचा प्रत्यय येईल. व्यवसायात लांबणीवर पडलेली कामे हाती घेऊन पूर्ण कराल. आर्थिक आवक चांगली राहील. नको त्या कामात बराच वेळ जाईल. नोकरीत वरिष्ठ तुम्हाला पूर्वीच्या चुका दुरुस्त करण्याची संधी देतील. सहकारी कामात मदत करतील, ही अपेक्षा ठेवू नका. नोकरीत कामात गुप्तता राखा. घरात महिलांनी झेपेल तेवढेच काम करून आराम करावा. आत्मपरीक्षण करून सुधारणा करता येईल.
सिंह : सप्ताहात मनोबल वाढेल. त्यामुळे व्यवसायात धडाडीने पुढे जाल. आर्थिक गुंतवणूक अचूक कराल. कामाचे व वेळेचे नियोजन फायदेशीर ठरेल. नोकरीत रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. अपेक्षित व्यवहारांना चालना मिळेल. कामे करताना नवीन ओळखीचा चांगला फायदा होईल. घरात महिलांची ताणतणावातून सुटका होईल. आवडत्या छंदात मन रमविता येईल. तरुणांचे विवाह जमतील. कलाकार, खेळाडूंना क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.
कन्या : हाती घ्याल ते तडीस न्याल.’ व्यवसायात आव्हाने स्वीकारून कामे कराल. पैशाची सोय बॅंका व हितचिंतकांच्या मदतीने होईल. तुमचा आत्मविश्वास दांडगा राहील. नोकरीत वरिष्ठ नवीन कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील. त्यासाठी जादा अधिकार व सवलतीही देतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. घरात महिलांनी प्रश्न सामंजस्याने सोडवावेत. रागांवर नियंत्रण ठेवावे. एखादी सुवार्ता कळेल.
तुळ : सप्ताहात स्वप्ने साकार झाल्यामुळे आनंद द्विगुणित होईल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील कामाचे नवीन कार्यक्षेत्र स्वीकाराल. नोकरीत नवीन आव्हाने स्वीकारून त्यात यश मिळवाल. इतरांनाही कामात मदत कराल. परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना गती येईल. घरात अनपेक्षित कामांवर बराच खर्च होईल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. कलाकार खेळाडूंना कार्यक्षेत्रात यश येईल.
वृश्चिक : सप्ताहात व्यवसायात कर्तव्यदक्ष राहाल. कामात बदल करून फायद्याचे प्रमाण वाढवाल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. घरात महिलांना कलागुण दाखवता येतील. वातावरण आनंदी राहील. कुटुंबासमवेत वेळ मजेत घालवाल.
धनु : व्यवसायात कामाचे समाधान मिळेल. कामांना वेग येईल. नवीन दिशा सापडेल. तुमचा हुरूप व उत्साह वाढेल. नोकरीत अनपेक्षित लाभाची शक्यता. इतर सहकाऱ्यांचे सहकार्य कसे मिळवता यावर यश अवलंबून राहील. नोकरदार महिलांनी दगदग कमी करावी. घरात महिलांनी हेकेखोरवृत्ती ठेवू नये. चिडचिड कमी करावी. बेफिकीर वागू नये. कलावंत, राजकारणी व्यक्तींनी अतिआत्मविश्वास टाळावा.
मकर : ग्रहमानाची साथ आहेच तरी निर्धाराने कामाला लागा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे हाती घ्याल. व्यवसायात प्रत्येक कामात यश संपादन कराल. अर्थप्राप्ती चांगली झाल्याने मनासारखे खर्च करू शकाल. नोकरीत सरकारी कामे गती घेतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन ओळखी होतील. घरात कामामुळे दगदग वाढेल. विश्रांती घ्यावीशी वाटेल. सभोवतालच्या व्यक्तीबाबत नवीन अनुभव येतील. खेळाडूंना कष्टाचे फळ चांगले मिळेल
कुंभ : अत्यंत धोरणी राहून प्रत्येक कृती कराल. व्यवसायात कार्यक्षमता वाढवून कामाचा उरक ठेवाल. कामात चोखंदळ राहाल. नोकरीत तुमची मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कामातील बेत गुप्त ठेवा. सामाजिक कार्यात भाग घ्याल. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. घरात सहनशीलता बाळगून कामे करावीत. आरोग्यास जपावे. कलावंत, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना कामात स्पृहणीय यश मिळेल.
मीन : काळाबरोबर राहून बदल केलात तर व्यवसायात यश संपादू शकाल. व्यवसायात सुसंवाद साधून कामे करण्यावर भर राहील. नवीन ओळखीचा चांगला उपयोग होईल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत अधिकाराचा योग्य वापर कराल. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. प्रवासयोग संभवतो. घरात महिलांना मन:स्वास्थ्य जपता येईल. नवीन खरेदीचा मोह होईल. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल.