ओतूर -रोहोकडी- येथील ऋतुजा अविनाश घोलप हिने नोव्हेंबर 2019मध्ये दि इन्स्टिटूट आफ चार्टर्ड अकाऊंट आफ इंडिया यांनी घेतलेल्या सीए फाऊंडेशन परीक्षेत 400 पैकी 346 गुण मिळवून भारतात 18व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. पुण्यातील बीएमसी कॉलेजची ती विद्यार्थीनी असून सीए र्फीाचडेशसाठी एकत्वम अकॅडमीत तिने शिक्षण घेत हे यश संपादन केले आहे. यापूर्वी तिने इयत्ता 10वी, 12वी या परीक्षांमध्ये अनुक्रमे 97 व 93 टक्के गुण मिळविले आहेत.
सीए फाउंडेशन परीक्षेत भारतात 18 वा क्रमांक मिळविल्याने जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तिची प्रत्यक्ष भेट घेऊन कौतुक करत तिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एवढे मोठे सुयश मिळविणारी ऋतुजा ही जुन्नर तालुक्यातील पहिली विद्यार्थिनी आहे. ऋतुजावर पंचक्रोशीत सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
ऋतुजाला प्रा. डॉ. दिशा राज्याध्यक्ष, प्रा. संजय जोशी, प्रा. मनीषा तरडेजा, प्रा. गिरीश जोशी, प्रा. ऋषभ जैन यांनी मार्गदर्शन केले. देशात सीए फाउंडेशनचा निकाल 35.10 टक्के लागला असून परीक्षेत 33.29 टक्के विद्यार्थी व 37.41 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्याची माहिती प्रा. अभिषेक झावरे यांनी दिली.