Rohit Sharma fined for Over speeding : भारताचा कर्णधार रोहित शर्मा बुधवारी चुकीच्या कारणांमुळे चर्चेत होता, जेव्हा पुणे-मुंबई महामार्गावर वेगवान गाडी चालवल्याबद्दल त्याला दोनदा दंड ठोठावण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या. क्रिकेटसारख्या खेळातसुद्धा केवळ शतक झळकावणं पुरेसं ठरत नाही, तर कमीत कमी वेळात, कमीत कमी चेंडूंत जो शतक झळकावेल तो खरा फलंदाज ठरतो. विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा सर्वांत वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला. सध्या तो भलताच फॉर्मात आहे. पण हाच वेग त्याने रस्त्यावर आणला आणि मुंबई ते पुणे अंतरात दोन ठिकाणी “ओव्हरस्पीडिंग’बद्दल दंडाची चलनं त्याला मिळाली
क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारतीय संघाच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी मंगळवारी रोहित मुंबईहून आपल्या कारनं पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमकडे येत होता. तेव्हा, भरधाव वेगात असलेली त्याची कार सीसीटीव्हीत कैद झाली आणि वेगमर्यादा ओलांडली असल्याचं स्पष्ट झालं.
पोलिसांनी सांगितले की, महामार्गावर 100 किमी ताशी वेग मर्यादा आहे. पण रोहित शर्मा महामार्गावर 105 किमी प्रतितास ते 117 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवताना आढळून आला. त्यामुळे रोहितला एकूण 4,000 रुपये (दोन्ही प्रसंगी प्रत्येकी 2,000 रुपये) दंड ठोठावण्यात आला. व त्याने गुरुवारी हा दंड भरला.
वेगाचे उल्लंघन 17 ऑक्टोबर रोजी घडले आणि नियमानुसार कारवाई करण्यात आली, त्यानंतर रोहितकडून हा दंड तात्काळ भरण्यात आला असे पोलिसांनी सांगितले आणि महामार्ग पोलीस अधीक्षक लता फड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
रोहित ताशी 200 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता, मात्र हे खरे नाही. अधिकृत अहवालानुसार, भारतीय कर्णधाराने त्या एक्सप्रेसवेवर स्पर्श केलेला कमाल वेग प्रत्यक्षात 117 किमी प्रतितास होता. एक्स्प्रेस वेच्या दोन्ही लेनवर बसवण्यात आलेल्या ऑटो कॅमेऱ्यात त्यांची आलिशान कार कैद झाली आहे. दोन वेगवेगळ्या प्रसंगी पोस्ट केलेल्या वेग मर्यादा ओलांडून कार पकडण्यात आली. पहिली पावती मुंबईहून पुण्याला जाताना कामशेत बोगद्याच्या जवळ तर तर दुसरी पावती परत येताना तळेगाव टोल नाक्याच्या जवळ करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दोन्ही लेनवर स्वयंचलित कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जर एखाद्या वाहनाने वेगमर्यादेचे उल्लंघन केले आणि कॅमेऱ्याने ते रेकॉर्ड केले, तर सिस्टीम कार मालकाला शुल्क आकारून वाहतूक चलन जारी करते.
वडगाव येथे तैनात असलेल्या महामार्ग पोलिसांच्या एका पोलिस अधिकाऱ्याने अधिकृतपणे अधिक माहिती दिली. कामशेत बोगद्याजवळ प्रथम उल्लंघनाची नोंद करण्यात आली कारण कार मुंबईहून पुण्याकडे जात होती आणि उल्लंघन 117 किमी प्रतितास वेगाने आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे फाट्याजवळ कार त्याच दिवशी 105 किमी प्रतितास या वेगाने पुण्याहून मुंबईकडे जात असताना दुसऱ्या उल्लंघनाची नोंद झाली.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाने सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात आपली अपराजित मालिक कायम ठेवली असून रोहितच्या नेतृत्वाखालील भारताने चार सामन्यांमध्ये चौथा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाने गुरुवारी बांगलादेशचा पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकात 8 गडी गमावून 256 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 41.3 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. रोहित शर्माने 48 धावांची, शुभमन गिलने 53 धावांची खेळी खेळली. विराट कोहलीने 97 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 103 धावा तर केएल राहुलने 34 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या.