चंद्रपूर – चंद्रपूर येथे चार वर्षांच्या मुलासह आईस्क्रीम घेण्यासाठी निघालेल्या गर्भवती महिलेचा मृतदेह (pregnant mother dead body) नदीच्या पुलाजवळ आढळला. धक्कादायक बाब ही या महिलेच्या मृतदेहाशेजारी तिचा चार वर्षांचा मुलगा रात्रभर बसून होता. (Chandrapur news)
सुषमा काकडे (Sushma kakade) असे या महिलेचे नाव आहे. सुषमा काकडे बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बल्लारपूर येथील टिचर्स कॉलनी येथून मुलगा दुर्वेशसह निघाल्या होत्या. मात्र त्या वेळेत परत आल्याच नाहीत, अशी माहिती पोलीस अधीक्षक रविंद्र सिंग परदेशी यांनी दिली.
सुषमा काकडे या आपल्या चार वर्षांच्या मुलासह घराबाहेर पडल्या होत्या. मात्र त्यांचा मृतदेह सापडला आहे. मृत महिलेच्या पतीचे नाव पवनकुमार काकडे असे असून ते बॅंक कर्मचारी आहेत. सुषमा काकडे यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. नंतर बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली.
राजुरा बल्लारपूर मार्गावरच्या वर्धा नदीच्या (Wardha river) पुलाजवळ सुषमा यांचा मृतदेह सापडल्याची माहिती काही लोकांनी दिली. गुरुवारी पहाटे हा मृतदेह सुषमा यांचा असल्याचे समजले.प्राथमिक अंदाजानुसार सुषमा या रात्री उशिरा पुलावरुन चिखलाच्या भागात पडल्या असाव्यात. त्यांचा मृत्यू कुठल्या कारणाने झाला याची कारणे शोधली जात आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.