Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चित्रपटातील तिच्या भूमिकेतून नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असते. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती शेअर करताना दिसते. सोनाली सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतेच सोनालीने तिचे काही फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहे. सोनालीचे हे फोटो फुकेतमधील आहे. सध्या तिचे हे फोटो चांगलेच चर्चेत आले आहे.
सोनालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने प्रिंटेड बॉडीकॉन गाऊन परिधान केला आहे. या लुकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत सोनालीने ‘जेव्हा मी एक दिवस फुकट मध्ये नाही, #Phuket मध्ये घालवला…’ असे गमंतीशीर कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये सोनाली एकापेक्षा एक पोज देताना देखील दिसते. सध्या सोनालीचे फोटो चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सोनालीने मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘मलाइकोट्टई वलीबन’ चित्रपटात ती झळकली. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. हा चित्रपट हिंदी, कन्नड, तमीळ व तेलुगू या भाषांमध्येही डब करण्यात आला आहे. या चित्रपटानंतर सोनाली ‘ताराराणी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २२ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.