Manoj Jarange Patil in Mumbai : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसह आज लोणावळा येथे पोहोचले आहेत. मुंबई येथील आझाद मैदानावर जरांगे यांचे आंदोलन नियोजित आहे. मात्र पोलिसांनी जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली असल्याचं समोर आलं आहे. एकीकडे जरांगे लोणावळ्यात पोहोचले असतानाच,
दुसरीकडे आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याने पुढं काय होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, अश्यातच मनोज जरांगे यांना आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार मुंबई पोलीस आयुक्तालयात गेले आहेत.
त्यांनी पोलीस आयु्क्त विवेस फणसाळकर यांना मराठा आंदोलनासाठी जागा करुन द्यावी, अशी विनंती केली आहे. ‘मराठा बांधव लाखोंच्या संख्येने येत आहेत, त्यांची योग्य सोय शासनाकडून होतील त्याची तयारी झाली पाहिजे. महिला येत आहेत, त्यामुळे पोलिसांची सुरक्षा असली पाहिजे, अशी विनंती केली.
पण महापालिकेकडे सरकारकडून अजून कोणतीही सूचना आलेली नाही. पोलीस आयुक्तालयातून जागा बदला असं सांगण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांचे समन्वय आणि पोलीस यांच्यात चर्चा सुरु आह. तेच निर्णय घेत आहेत. पण जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो लोक येत आहेत. त्यांची सुविधा झाली पाहिजे.’ असं रोहित पवार यावेळी म्हणाले.
परवानगी नाकारल्याने मनोज जरांगे काय? म्हणाले…..
‘पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याबाबत विचारले असता, कोण म्हणलं नाकारली, परवानगी दिलीय. न्यायालयाने दिलीय, आमचे वकील बांधवही कोर्टात चाललेत, असं मनोज जरांगे म्हणाले. मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो, असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली आहे, पण जरांगे पाटील यांनी निर्णय घेतला आहे, आम्ही मुंबईकडे जात आहोत, असं जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. मनोज जरांगे हे कोणत्याही नोटीसला किंवा कारवाईला घाबरत नाहीत, असं यावेळी म्हणाले.
पोलिसांनी सुचवलं पर्यायी मैदान –
आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांनी आझाद मैदान येथील परवानगी नाकारली आहे. मैदान छोटं असून आंदोलनासाठी योग्य नसल्याचं पोलिसांनी म्हंटल आहे. मुंबई पोलीस यांनी या आंदोलनासाठी खारघर येथील मैदान सुचवले असल्याचं वृत्त आहे.