Punjab National Bank (PNB): पंजाब नॅशनल बँकने आज तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. डिसेंबरच्या तिमाहीत बँकेने तिप्पट नफा कमावला आहे. अशा परिस्थितीत PNB चे शेअर्स 2% ने वाढून 101.30 रुपयांवर पोहोचले आहेत. शेअर बाजार विश्लेषकांच्या मते, PNB शेअर अल्पावधीतच 120 रुपयांवर पोहोचेल.
डिसेंबर तिमाही निकाल –
चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) PNB चा नफा तिपटीने वाढून 2,223 कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच कालावधीत बँकेला 629 कोटी रुपयांचा नफा झाला होता. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत, पीएनबीने सांगितले की, या तिमाहीत त्यांचे एकूण उत्पन्न वाढून 29,962 कोटी रुपये झाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 25,722 कोटी रुपये होते.
या तिमाहीत बँकेचे व्याज उत्पन्न वाढून 27,289 कोटी रुपये झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ते 22,384 कोटी रुपये होते. या कालावधीत बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) 6.24 टक्क्यांवर घसरली. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो 9.76 टक्के होता. त्याचप्रमाणे बँकेचा निव्वळ एनपीएही 3.30 टक्क्यांवरून 0.96 टक्क्यांवर आला आहे.
(टीप: येथे केवळ समभागाच्या कार्यप्रदर्शनाची माहिती दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचा विवेक वापरा.)