मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा सध्या तिच्या आगामी ‘ट्रायल पीरियड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री मानव कौलसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याचा एक प्रोमो व्हिडिओ काल रिलीज करण्यात आला होता, ज्याला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. त्याचबरोबर जेनेलिया देखील चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये पूर्णपणे व्यस्त आहे. अशात तिने लग्नानंतर अभिनयातून ब्रेक घेण्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
बॉलीवूड ते साऊथ चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनय कौशल्याचा प्रसार करणारी जेनेलिया डिसूजा रितेश देशमुखसोबत लग्न केल्यानंतर पडद्यापासून दूर गेली. यावर चाहत्यांकडून अंदाज बांधला जाऊ लागला की कदाचित रितेशने जेनेलियाला चित्रपटात काम करण्यास मनाई केली असेल. मात्र, आता खुद्द जेनेलियानेच या सर्व अफवांवर मौन तोडले असून, पडद्यापासून दूर जाण्याचे कारण ती स्पष्ट करताना दिसली आहे.
जेनेलिया डिसूझाने अफवांवर सांगितले की, असे काहीही नाही. लोक अजूनही माझ्याबद्दल असेच काही बोलतात जेनेलिया म्हणाली की, लोक त्यांना जे म्हणायचे आहे ते म्हणतात, पण त्यात तथ्य नाही. जेनेलियाने स्पष्ट केले की तिला पती आणि मुलांसोबत वेळ घालवायचा होता त्यामुळे मी स्वतः ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. जेनेलिया डिसूझाने स्पष्ट केले की,’मला अजूनही तिच्या मुलांसोबत राहणे खूप आवडते. तसेच, जेव्हा मला चित्रपटात काम करायचं असेल तेव्हा मी करेल.’