सातारा -बादितांची संख्या कमी होत असली तरी करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट होत नसल्यामुळे जिल्ह्यातील चिंता वाढत आहे. जिल्ह्यातील आणखी27 रुग्णांचा मृत्यू झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींच्या संख्येने 1300 चा टप्पा गाठला आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात सोनगाव ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, वेळे कामटी ता. सातारा येथील 49 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, शिरवळ ता. खंडाळा येथील 82 वर्षीय पुरुष, सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठेतील 54 वर्षीय पुरुष, न्यू एमआयडीसीमधील 82 वर्षीय पुरुष, इसकळ ता. कोरेगाव येथील सात दिवसांचे बालक, मल्हार पेठ ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 75 वर्षीय महिला, आदर्की खुर्द ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष, लिंब ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये शिवथर ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, शाहूपुरीतील गायत्री कॉलनीमधील 83 वर्षीय महिला, हणमंतनगर ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, मलकापूर ता. कराड येथील 57 वर्षीय पुरुष
कराड येथील 75 वर्षीय पुरुष, शिवडे ता. कराड येथील 73 वर्षीय महिला तसेच जिल्हा रुग्णालयात रात्री उशिरा विठ्ठलनगर खेड ता. सातारा येथील 85 वर्षीय महिला, चोरे ता. कराड येथील 60 वर्षीय महिला, येळगाव ता. कराड येथील 45 वर्षीय पुरुष, बेलवडे ता. कराड येथील 60 वर्षीय महिला, हवेली ता. कराड येथील 62 वर्षीय महिला, कानेगाव ता. कराड येथील 76 वर्षीय पुरुष, हेळगाव ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, वडोली निळेश्वर ता. कराड येथील 77 वर्षीय पुरुष, यशवंतनगर ता. कराड येथील 55 वर्षीय महिला अशा एकूण 27 करोनाबाधितांचा उपचारा -दरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.