मुंबई – सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येबाबत विविध तर्क वर्तविले जात आहेत. सुशांतच्या मृत्यूस बॉलीवूड कॅम्प, नेपोटिज्म कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर सुशांतचे चाहते त्याला न्याय मिळावा, अशी मागणी करत अनेक सेलिब्रिटींना ट्रोल करण्यात आले आहे.
करण जोहर, आलिया भट्ट, सलमान खान यांच्यानंतर काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक महेश भट्टवरही टीका झाली. सध्या सोशल मीडियावर सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि महेश भट्टचे जुने फोटो व्हायरल होत होते. या फोटोंमध्ये महेश भट्ट यांनी रियाच्या खांद्यावर डोके ठेवले आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये रियानेही महेश भट्टला मिठी मारली आहे. हे फोटो खूपच व्हायरल होत असून अनेक जणांनी महेश भट्टवर निशाणा साधला अहे. महेशसह काही चाहत्यांनी रियालाही ट्रोल केले आहे.
दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरणी सीबीआयच्या चौकशी वेळी अनेक महत्वाचे खुलासे होत आहेत. रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक-निर्माता महेश भट यांच्यामधील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यापासून रिया आणि महेश यांच्या नात्याबद्दल सातत्याने बोलले जात आहेत. रियाने आता सीबीआय चौकशीदरम्यान त्या व्हायरल झालेल्या व्हाट्सअॅप चॅटविषयी खुलासा केला आहे.
रियाने सांगितले की, जेव्हापासून महेश भट यांच्याबरोबर काम करत आहे तेव्हापासून महेश भट आणि माझे संबंध खूप चांगले आहेत. ते माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. जेव्हा मी सुशांतचे घर सोडले तेव्हा मी त्यांच्याबरोबर व्हाट्सअॅप वरून बातचीत केली होती हे खरे आहे. महेश भट हे मला लहान बाळ समजतात आणि मी त्यांना सुरुवातीपासूनच सर बोलते.
ती पुढे म्हणाली , 8 जून रोजी मी त्यांना म्हटले की मला घराबाहेर काढण्यात आले आहे आणि मी खूप कोलमडून गेली आहे. सर त्याला कळात नाही का मी एवढे दिवस त्याची काळजी घेत आहे. त्याची देखरेख करता करता माझी अवस्था खूप खराब झाली आहे, असं रिया त्या दिवशी महेश भट यांना व्हाट्सअॅपवरून बोलली असल्याचं रियाने सीबीआयला सांगितले आहे. यावेळी सुशांत विषयी बोलताना रिया भावूक झाली होती आणि तिला अश्रू अनावर झाले होते.