मुंबई – ‘जलेबी’ सारख्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या काही वर्षांत चित्रपटांपेक्षा सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे जास्त चर्चेत होती. रिया या प्रकरणातील मुख्य दोषी असल्याचे मानले जात होते. या प्रकरणात तिच्यासोबत भाऊ शोविकचेही नाव पुढे आले होते. मात्र, नंतर त्याला क्लीनचीट मिळाली.
आता दोन्ही भावंडं या प्रकरणातून सावरली आहेत आणि आपापल्या करिअरमध्ये पुढे जात आहेत. दरम्यान, रियाने भाऊ – शोविक- सोबतचे काही फोटो शेअर केले आहे, ज्यामध्ये ती त्याला किस करतांना आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.
रिया चक्रवर्तीने तिच्या भावासोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोवर युजर्स तिला ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावरील फोटोंमध्ये ती भाऊ शोविकसोबत पूलच्या बाजूला बसून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असल्याचे दिसत आहे.रिया किस करतानाही दिसत आहे. रियाने वाढदिवसानिमित्त शोविकसोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे शेअर करण्यासोबतच रियाने भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांमधील अप्रतिम केमिस्ट्री या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. रिया चक्रवर्तीच्या फोटोंवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. तिला टार्गेट करण्याची एकही संधी लोक सोडत नाहीये.
मात्र, रिया चक्रवर्तीबद्दल बोलायचे झाले तर ती ‘MTV रोडीज 19 – कर्म या कांड’ मध्ये दिसली होती. तिच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची ‘चेहरे’ चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत इमरान हाश्मी, अमिताभ बच्चन यांसारखे स्टार्स दिसले होते.