मुंबई – अभिनेता प्रभास ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे घराघरात पोहचला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडो रुपयांची कमाई केली. या चित्रपटातील प्रभासचा लुक चर्चेचा विषय ठरला होता. कठोर प्रशिक्षणाद्वारे त्याने आपल्यासाठी बॉडी खूप मेहनत घेतली होती. मात्र डॅशिंग आणि हँडसम वाटणाऱ्या त्याच्या लुकनंतर प्रभासचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून सर्वचजण अचंबित झाले आहे. या फोटोतील लुक पाहून प्रभासला ओळखणे देखील कठीण होते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये प्रभासने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला असून डोळ्यांवर गॉगल घातला आहे. तर त्याच्या डोक्यावर टक्कल पडल्याचे दिसते. त्यामुळे त्याला खऱ्या आयुष्यात टक्कल पडले की काय? असा सवाल चाहते करत आहेत. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. याआधी प्रभासला कोणीही या लुकमध्ये पाहिलेलं नाही. मात्र प्रभासच्या व्हायरल फोटोमागचे सत्य आता समोर आले आहे. व्हायरल होत असलेला प्रभासचा हा फोटो फोटोशॉप करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याचा हा फोटो खोटा असल्याचे स्पष्ट होत आहे.
What happened to PRabhas ?
Why he’s look bald in this pic ?
#prabhas #salaar pic.twitter.com/qV5cDEWrHd— P∆BLO ™ (@BhAAi_007) August 21, 2023
दरम्यान, मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या सिनेमात प्रभास झळकला होता. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसला आहे. तर, अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेचे पात्र साकारत आहे. तर रावणाचे पात्र सैफ अली खानने साकारले आहे. मात्र या चित्रपटाला मोठा विरोध करण्यात आला होता. या चित्रपटातील कलाकारांच्या वेशभुषेवर आणि संवादावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाई करू शकला नाही.