तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगरपरिषद दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिरास प्रतिसाद मिळाला.
मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्याधिकारी ममता राठोड, महिला बाल कल्याण प्रमुख सुवर्णा काळे, शहर अभियान व्यवस्थापक विभा वाणी, पल्लवी खंडागळे आदी उपस्थित होते.
या वेळी टीम फाउंडेशनचे प्रशिक्षक प्रवीण खंडागळे यांनी उद्योजकतेविषयी उपयुक्त माहिती व मार्गदर्शन केले. या वेळी माझी वसुंधरा ३.० या अभियानाअंतर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. त्यात १ टाकाऊ पासून टिकाऊ या स्पर्धेमध्ये प्रथम सुजाता मलघे, द्वितीय रेश्मा भोसले, तृतीय उज्वला दाभाडे तसेच अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत वापर करणारे कुटुंबात जयश्री दाभाडे. तर, पथनाट्य सादरीकरणात तेजस्विनी महिला बचत यांना बक्षिसे देण्यात आली.
या वेळी प्रास्ताविक उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी केले. सूत्रसंचालन शहर अभियान व्यवस्थापक विभा वाणी यांनी केले. आभार प्रतिभा घोडके यांनी मानले.