पिंपरी – वकिल संरक्षण कायदा मंजूर करण्याची मागणी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार अससोसिएशनच्या वतीने करण्यात आली असून शहरातील वकिलांचे विविध प्रश्न सोडविण्याचे निवेदन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार अससोसिएशनच्या वतीने बार कौन्सिलला देण्यात आले आहे.
एडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट तात्काळ मंजूर झाला पाहिजे या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनमधील ज्येष्ठ वकील, माजी अध्यक्ष व विद्यमान अध्यक्ष व कमिटी सहभागी होत आंदोलनास पाठिंबा दिला आहे. पिंपरी बारसह महाराष्ट्रातील अनेक वकील संघटनेच्या वतीने न्यायालयीन कामकाजापासून वकील अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला होता.
त्यांच्यासाठी महत्वाच्या प्रश्नांच्या अनुषंगाने वकील संरक्षण कायदा व पिंपरी चिंचवडमधील वकिलांचे विविध प्रश्न घेऊन बार कौन्सिलचे ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष ॲड. पारिजात पांडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲ ड. जयंत जायभावे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे ॲड. विठ्ठल कोंडे देशमुख, ॲड. गजानन चव्हाण, ॲड. अविनाश भिडे, ॲड. संग्राम देशमुख, ॲड. सुदीप पासबोला उपस्थित होते.
सनद पडताळणी संदर्भात माहिती
या वेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. एस. बी. चांडक, ॲड. किरण पवार, अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांनी बार कौन्सिलच्या सदस्यांसमोर वकिलांचे विविध प्रश्न मांडले. वकील संरक्षण कायदा, ई-फायलिंग संदर्भातील अडचणींबाबत निवेदन दिले. या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या वकिलाच्या पदवी व सनद पडताळणी संदर्भात यावेळी माहिती घेण्यात आली. याप्रसंगी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड. प्रतीक्षा खिलारी,सचिव ॲड. धनंजय कोकणे, महिला सचिव ॲड. मोनिका सचवणी, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, ऑडिटर ॲड. संदीप तापकीर, सदस्या ॲड. मिनल दर्शीले, ॲड. मंगेश खराबे, ॲड. मानसी उदासी, ॲड. विवेक राऊत, ॲड.शंकर घंगाळे, महिला सचिव ॲड. मोनिका गाढवे, ॲड. रामहरी कसबे, ॲड. चेतन सुखेजा, ॲड. नरसिंह इंगळे उपस्थित होते.