अक्षय आढळराव पाटील : शिरूर तालुक्यात संवाद दौरा
रांजणगाव गणपती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव गणपती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन शिवसेना युवानेते अक्षय आढळराव पाटील यांनी दिले.
शिरूर तालुक्यात संवाद दौर्या प्रसंगी रांजणगाव गणपती, सोनेसांगवी, कारेगाव, कवठे येमाई, मलठण, अण्णापूर, शिरूर या गावांना भेटी देऊन पदाधिकार्यांशी संवाद साधताना अक्षय आढळराव बोलत होते. यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य विक्रम पाचुंदकर पाटील,
भाजप कामगार आघाडीचे राज्य सचिव तुळाशीदास दुंडे, युवासेना पुणे जिल्हा सरचिटणीस वैभव ढोकले, युवासेना तालुकाप्रमुख विष्णु वाळके पाटील, नवनिर्वाचित शिवसेना शिरूर-आंबेगाव तालुकाप्रमुख मल्हारी काळे, युवासेना संघटक वैभव खेडकर, शिवाजीराव नवले, शिवसेना विभागप्रमुख भारत नवले, सोमनाथ नवले, माजी.ग्रामपंचायत सदस्य संदीप कुटे, गणेश शिंदे, श्रीरंग शेलार,
उद्योग आघाडी जिल्हाप्रमुख अभिजित बत्ते, युवासेना समन्वयक गोवर्धन पाचंगे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख संग्राम शिंदे, संदीप गव्हाणे, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक योगेश बाणखेले, उत्तमराव गव्हाणे, अंकुश शेवाळे, अक्षय खेडकर, युवासेना समन्वयक आकाश मोरडे, सोशल मीडिया तालुकाप्रमुख मोहन घोलप यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.