नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात शेरेबाजी केल्याबद्दल विरोधी पक्षांच्या प्रवक्त्याला अटक होण्याच्या आतापर्यंत दोन घटना घडल्या. कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांच्याआधी तृणमूल कॉंग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना अटक करण्यात आली. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये गुजरातच्या मोरबीत झुलता पूल कोसळला. त्या दुर्घटनेनंतर मोदींनी मोरबीला भेट दिली.
त्याविषयी एक बनावट बातमी प्रसिद्ध झाली. त्या बातमीला योग्य ठरवणारे ट्विट गोखले यांनी केले होते. त्यावरून त्यांना मागील वर्षी डिसेंबरमध्ये अटक करण्यात आली. राजस्थानच्या जयपूरमध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आले. तिथून संबंधित प्रकरणी जामीन मिळण्याआधी त्यांना गुजरातला नेण्यात आले.