रेड बुल टशन 2019 वेस्टर्न एडिशन : क्‍वॉलिफायर्समध्ये 16 संघांचा सहभाग

कोल्हापूर – कॉलेज व क्‍लब स्तरावरील खेळाडूंसाठी असलेली स्पर्धात्मक कबड्डी स्पर्धा ‘रेड बुल टशन’च्या वेस्टर्न इंडिया एडिशनच्या पहिल्याच कोल्हापूर क्‍वॉलिफायर्सचे कोल्हापूरमध्ये यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन, कोल्हापूर येथे बादफेरीच्या आधारावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेच्या कोल्हापूर क्‍वॉलिफायरमध्ये 16 संघांनी सहभाग घेतला होता.

या पात्रता फेरीमध्ये सहभाग घेतलेल्या संघांमध्ये कबड्डीचा उच्चस्तरीय खेळ दिसण्यात आला. अंतिम सामन्यामध्ये राष्ट्रसेवाले संघाने मावळा सदोलीचा पराभव करत कोल्हापूर क्‍वॉलिफायर्समध्ये विजय मिळवला. हा संघ आता पुण्यातील फिनिक्‍स मार्केट सिटी येथे आयोजित करण्यात येणा-या फायनल्समध्ये पुणे क्‍वॉलिफायर्स व अलिबाग क्‍वॉलिफायर्सच्या विजेत्या संघांसोबत सामना करणार आहे.

या उपक्रमाबाबत कैलाश कंपडाल म्हणाले, ”कबड्डी खेळाबाबत भारतीयांमध्ये खासकरून तरूणांमध्ये प्रचंड प्रतिसाद व रूची दिसण्यात आली आहे. रेड बुल टशन सारख्या स्पर्धा तळागाळातील तरूण प्रतिभांना प्रोत्साहित करण्यासह मार्गदर्शन करण्यामध्ये मदत करतात.

पुणेरी पलटन आणि एनर्जी ड्रिंक कंपनी रेड बुल यांचा तळागाळातील प्रतिभांना मार्गदर्शन करण्यासह त्यांना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी मंच देण्याच्या माध्यमातून देशातील कबड्डीचा दर्जा उंचावण्याचा समान उद्देश आहे. आम्ही गेल्या वर्षाप्रमाणे यंदा देखील विवो प्रो कबड्डी लीगच्या सातव्या पर्वापूर्वी आमच्या होम स्टेडियममध्ये टीमसह उदयोन्मुख प्रतिभांना प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न सुरू ठेवू. आम्ही रेड बुल टशन क्‍वॉलिफायर्समधून तरूण प्रतिभांना ओळखून आमच्या मार्गदर्शनपर उपक्रमासाठी त्यांना संधी देण्यासाठी उत्सुक आहोत असेही ते यावेळी म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.