हिंगोली – भाजपत आणखी एक बंडखोरी झाल्याने भाजपसह महायुतीला झटका बसला आहे. भाजपचे रामदास पाटील (Ramdas Patil) यांनी बंडखोरी करत लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अने हालचाली सुरु असल्याचं दिसून येत आहे. नुकताच जळगाव भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आता निवडणुकीच्या आधी भाजपला आणखी एक धक्का बसला आहे.
हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे इच्छुक असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांनी अखेर बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. रामदास पाटील सुमठाणकर यांनी सुरुवातीला हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांची उमेदवारी बदलावी आणि भाजपचा उमेदवार द्यावा, अशी मागणी केली होती. रामदास पाटलांनी गुरुवारी अखेर बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.