fbpx

भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन करणार शिवसेनेत प्रवेश

मुंबई : पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता भाजपला आणखी एक धक्का बसणार आहे. कारण भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन या आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गीता जैन यांच्या सेनेत प्रवेश करण्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. भाजपमध्ये बंडखोरी करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. भाजपच्या त्या माजी महापौर होत्या. त्यामुळे भाजपला एकप्रकारे हा धक्का मानला जात आहे.

मीरा-भाईंदर मतदारसंघातील अपक्ष आमदार गीता जैन या आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. आज दुपारी १२.३० वाजता मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.