fbpx

कंगनाच्या ‘या’ वक्तव्यामुळे महाराष्ट्रात निर्माण होणार नवा वाद, “सावरकारांप्रमाणे…”

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल या दोघींना मुंबई पोलिसांनी बुधवारी समन्स बजावले. त्यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. प्रक्षोभक वक्तव्ये करून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भिन्न समुदायांत विद्वेष निर्माण करत असल्याचा दोन्ही भगिनींवर आरोप आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याच पार्श्ववभूमीवर आता कंगणाने ट्विटरवरून निशाणा साधला आहे. “वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई तसंच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याप्रमाणे स्वतः तुरूंगात जायला तयार असल्याचं कंगनाने म्हंटल आहे.

कंगणा म्हणते, ‘मी वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई तसंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या लोकांना पूजते. आज हे सरकार मला तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे मला माझ्या निर्णयावर गर्व आहे. मी तुरूंगात जाण्याची वाट पाहतेय आहे. हे माझे आदर्श असून त्यांनी जो त्रास सहन केला तो त्रास सहन करण्याची वाट पाहतेय.’

राणी लक्ष्मीबाई यांचा किल्ला पाडण्यात आला, वीर सावरकारांना तुरूंगात टाकण्यात आलं त्याप्रमाणे मलाही तुरूगांत टाकण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येतायत, असंही कंगणा पुढे म्हणालीये.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.