fbpx

महेश भट्ट बॉलीवूडमधील डॉन

सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येबाबत विविध तर्क वर्तविले जात आहेत. सुशांतच्या मृत्यूस बॉलीवूड कॅम्प, नेपोटिज्म कारणीभूत असल्याचे बोलले जात  होते. दुसरीकडे सोशल मीडियावर सुशांतचे चाहते त्याला न्याय मिळावा, अशी मागणी करत अनेक सेलिब्रिटींना ट्रोल करत होते. काही दिवसापूर्वी  दिग्दर्शक महेश भट्टवरही सातत्याने चर्चेचा  विषय ठरत असल्याचं दिसून येत आहे.

 यातच आता महेश भट्ट यांच्या सुनेने लुविना लोढ हिने त्यांच्यावर आणि तिच्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहे. महेश भट्ट कलाविश्वातील डॉन आहे, त्याच्या एका फोनमुळे कलाविश्वातील सगळं चित्र पालटून जातं असं तिने म्हटलं आहे.

यामुळे पुन्हा एकदा महेश भट्टवर सोशल मीडियावर टीका होत आहे. याबाबत  लुविना लोढने  ट्विटवर व्हिडियो शेअर केला आहे.

काय म्हणाली लुविना लोढ

‘महेश भट्ट या कलाविश्वातला सगळ्या मोठा डॉन आहे. माझं लग्न महेश भट्टच्या भाच्यासोबत सुमित सभरवालसोबत झालं असून मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. तो कलाविश्वात मुली सप्लाय करतो.या सगळ्याची कल्पना महेश भट्टला आहे. सुमित ड्रग्स सप्लाय करतो. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो आहेत.  हा व्हिडीओ मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी करत आहे.  मात्र या व्हिडियोमुळे  जर पुढे जाऊन माझ्यासोबत किंवा माझ्या कुटुंबासोबत काही कमी जास्त झालं तर त्याला महेश भट्ट, सुमित सभरवाल, साहिल सेहगल, कुमकुम सेहगल हे जबाबदार असतील”.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.