WPL Live Cricket Score, MI vs RCB, Eliminator 2024 : आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात महिला प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या सामन्यातील विजयी संघ 17 मार्च रोजी अंतिम फेरीत दिल्लीशी भिडणार आहे. मुंबईने गुजरातविरुद्ध विजय मिळवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला तर आरसीबीने मुंबईविरुद्ध शानदार विजय मिळवला आणि प्लेऑफमध्ये धडक मारली.
एलिमिनेटरच्या लढतीत खेळणार असलेले मंबई व बंगळुरु हे दोन्ही संघ समतोल आहेत. मानधनाच्या तोडीस तोड कामगिरी हरमनप्रीतनेही केली आहे. दोघींचेही नेतृत्व सरस ठरले आहे. मात्र, आता या एलिमिनेटर लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली आहे.
तत्पूर्वी, आरसीबीने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार स्मृती मंधाना म्हणाली की, तिचा संघ कोणताही बदल न करता एलिमिनेटर सामन्यात प्रवेश करेल. दरम्यान, एमआयची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, यास्तिका भाटिया संघात परतली आहे. प्रियांका बालाच्या जागी तिला संधी मिळाली आहे.
MI vs RCB : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
मुंबई इंडियन्स : हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नताली सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया कर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, एस सजना, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
The Line-ups are here 👀
1⃣ change for Mumbai Indians as @YastikaBhatia is named in the Playing XI in place of Priyanka Bala.
Royal Challengers Bangalore remain unchanged.
Follow the match ▶️ https://t.co/QzNEzVGRhA#TATAWPL | #MIvRCB | #Eliminator pic.twitter.com/3CDY2no6yK
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2024
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, ऋचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, दिशा कसाट, श्रेयंका पाटील, शोभना आशा, श्रद्धा पोखरकर, रेणुका सिंग.
Ranji Trophy 2024 : चॅम्पियन मुंबईवर पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
दरम्यान, मुंबई व बंगळुरुने यंदाच्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. मात्र, त्यांना अव्वल स्थान मिळवण्यात यश आले नाही. दिल्ली कॅपिटल्सने मात्र, सर्वाधिक 12 गुणांसह अव्वल स्थान मिळवताना थेट अंतिम लढतीसाठी पात्रता मिळवली. दिल्ली संघाने 8 सामने खेळताना 6 सामने जिंकले तर 2 सामने गमावले. दुसऱ्या क्रमांकावरील मुंबई संघाने 8 सामने खेळताना 5 सामने जिंकले तर तीन सामने गमावले होते.
बंगळुरुनेही 8 सामन्यांतून 4 विजय मिळवले तर 4 पराभव पत्करले आहेत. यंदाच्या मोसमात गतविजेत्या मुंबई संघाला थेट अंतिम फेरीत पात्र होता आले नाही. त्यामुळेच त्यांना आता एलिमिनेटरची लढत खेळावी लागत आहे . स्पर्धेतील अन्य दोन संघ युपी वॉरिअर्स व गुजरात जायंट्सची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही व त्यामुळे यंदाच्या स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपूष्टात आले आहे.