नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव वाढत असून अशातच रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)चे गवर्नर शक्तिकांत दास आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Reserve Bank of India (RBI) Governor Shaktikanta Das to address at 10:00 AM today. (file pic) pic.twitter.com/3tfLrIJIHj
— ANI (@ANI) April 17, 2020
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील उद्योगधंदे बंद आहेत. अशातच अनेक आर्थिक अडचणींना समोरे जावे लागत असून भविष्यातही आर्थिक मंदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या परिस्थितीशी सामना करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया काय घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, याआधी 27 मार्च रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गवर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 0.75 टक्यांची घट झाल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे रेपो रेट 5.15 टक्यांवरून 4.40 टक्के करण्यात आले आहे. रेपो रेट म्हणजे, रिझर्व बँक ऑफ इंडिया रेपो रेटच्या आधारे इतर बँकांना कर्ज देते.
शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर 5.15 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दरात 0.90 टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स रेपो दर 4.90 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकाता दास यांनी केली होती. याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही 0.90 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे.