नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेने स्टेट बॅंक ऑफ इंडियासह अन्य नऊ बॅंकांना दंड ठोठावला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. स्टेट बॅंकेसह पंजाब नॅशनल बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदासह व्यावसायिक बॅंकांनी बॅंकांतील किंग फिशर एअरलाईन्सच्या खात्यात दोन बॅंकांच्या झालेल्या फसवणुकीची माहिती उशिरा दिल्यासह अनेक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला गेला आहे.
फसवणुकीची माहिती विलंबाने दिल्याबद्दल आम्हाला दंड ठोठावला गेला असल्याचे या नऊ बॅंकांनी स्वतंत्रपणे म्हटले आहे. पंजाब नॅशनल बॅंकेला तिने किंग फिशर एअरलाईन्सच्या खात्यातील फसवणुकीची माहिती उशिरा दिल्याबद्दल लाख रुपये दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बॅंकेचा आदेश मिळाल्यापासून 14 दिवसांत हा दंड भरायचा आहे.