नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांनी पंतप्रधानांचे आदरातिथ्य केले. मात्र, या दरम्यान पत्रकार रवी नायर यांनी पंतप्रधानांचे काही आक्षेपार्ह फोटो ट्विट केले आहेत. त्यावरून आता नायर यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.ट्विटरवर एक हॅशटॅग देखील ट्रेंडिंगवर असल्याचे समोर आले आहे.
पत्रकार रवी नायर यांनी पंतप्रधान मोदींचे काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो आपण डिलीट करणार नसल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट पोस्ट करत डॉ. प्राची साध्वी यांनी रवी यांना तात्काळ अटक करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
तत्काल प्रभाव से इस घटिया मानसिकता के आदमी को गिरफ्तार किया जाए।#ArrestRaviNair pic.twitter.com/AFOfpr0vgl
— Dr. Prachi Sadhvi (@Sadhvi_prachi) June 22, 2023
प्राची यांच्या ट्विटला उत्तर देत, रवी नायर यांनी त्यांना ओपन चॅलेंज दिले आहे. “हाय प्राची (मला तुमचं खरं नाव माहिती नाही), मात्र हे फोटो खोटे आणि फोटोशॉप असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही जर हे सिद्ध केलं तर मी नक्कीच माझं ट्विट डिलीट करेल. माझं तुम्हाला हे खुलं चॅलेंज आहे. कृपया हे स्वीकारा.” अशा आशयाचे ट्विट रवी नायर यांनी केले आहे.
Hey Prachi ( I don't your real name), the onus is on you to provide evidence that all these photographs are fake and photoshopped.
If you prove it, I'll delete my tweet and apologise for my mistake.This is an open challenge. Please accept it https://t.co/E2AtN2mzAK
— Ravi Nair (@t_d_h_nair) June 22, 2023
या सर्व प्रकारानंतर ट्विटरवर #ArrestRaviNair हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगट्या १७ हजारांहून अधिक पोस्ट समोर आल्या आहेत. यातील बहुतांश ट्विटच्या माध्यमातून रवी नायर यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
रवी नायर हे पहिल्यांदाच वादात अडकले नाहीत यापूर्वी देखील भाजप आणि अदानी यांच्यामधील आर्थिक व्यवहारांबाबत काही लेख लिहिले होते. अदानी समुहाने आपली बदनामी केल्याबद्दल रवी यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.