नवी दिल्ली : रणजी चषक स्पर्धेत महाराष्ट्राला पहिल्या डावात ४४ धावांत गुंडाळल्यानंतर सेनादलाने पहिल्या डावात सर्वबाद २८५ धावा करत २४१ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर महाराष्ट्राने दुस-या डावात दुस-या दिवसअखेर ५ बाद ९३ धावा केल्या असून ते अजूनही १४८ धावांनी पिछाडीवर आहेत. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विशांत मोरे ३३ आणि नौशाद शेख ४० धावांवर खेळत होता.
Stumps Day 2: Maharashtra – 93/5 in 33.6 overs (V V More 33 off 80, N S Shaikh 40 off 85) #SERvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 4, 2020
दिल्लीच्या पालम ए स्टेडियमवर ही लढत सुरू आहे. कालच्या ४ बाद १४१ वरून पुढे खेळताना सेनादलाने दुस-या दिवशी ६ विकेटच्या मोबदल्यात आणखी १४४ धावांची भर टाकत सर्वबाद २८५ धावा केल्या.
Innings break: Services – 285/10 in 95.2 overs (P S Poonia 2 off 20, Sachidanand Pandey 0 off 8) #SERvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 4, 2020
सेनादलाकडून पहिल्या डावात रवी चौहानने सर्वाधिक ६५ तर विकास हाथवाला आणि एपी शर्माने प्रत्येकी ४७ धावा केल्या. महाराष्ट्राकडून गोलंदाजीत मनोज इंगळेने (७३/५) तर संकलेचा (७८/२), सत्यजित बच्छावने (१८/२) गडी बाद केले.
MD Ingale 5 WICKETS! (24.4-8-66-5), Services 274/8 #SERvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 4, 2020
प्रत्युत्तरात दुस-या डावातही महाराष्ट्राचे फलंदाज ढेपाळले. सेनादलाच्या सचिदानंद पांडेने ३ तर दिवेश पठाणियाने २ गडी बाद करत अवघ्या २५ धावसंख्येवर महाराष्ट्राचा निम्मा संघ गारद केला. यामध्ये रूतुराज गायकवाड ०, ट्रंकवाला १, चिराग खुराणा ४, अंकित बावणे ० आणि राहुला त्रिपाठी ११ धावा करून माघारी परतले.
WICKET! Over: 9.3 S S Bachhav 0(3) ct A A Salvi b Sachidanand Pandey, Maharashtra 25/5 #SERvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 4, 2020
त्यानंतर कर्णधार नौशाद शेखने नाबाद ४० आणि विशांत मोरेने नाबाद ३३ धावा करत महाराष्ट्राचा डाव सावरला आणि दिवसअखेर संघाची धावसंख्या ९३ पर्यंत नेली.