केपटाउन : इंग्लंड-आफ्रिका दरम्यान मालिकेतील दुस-या कसोटी क्रिकेटच्या दुस-या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव २६९ वर आटोपल्यानंतर प्रत्युत्तरात द. आफ्रिकेने दुस-या दिवसअखेर ८ बाद २१५ अशी मजल मारली आहे. ते अजूनही ५४ धावांनी पिछाडीवर आहेत.
कालच्या ९ बाद २६२ वरून पुढं खेळताना इंग्लंडला दुस-या दिवशी आणखी ७ धावांची भर घालता आली. अँडरसन ४ धावांवर बाद होताच इंग्लंडचा पहिला डाव २६९ वर संपुष्टात आला. आफ्रिकेकडून रबाडाने ३, नाॅर्टजेने २, फिलँडरने २, प्रिटोरियसने २ आणि केशव महाराजने १ गडी बाद केला.
All out | ENG: 269
Rabada wraps it up early on day 2.
Anderson out caught at slip by van der Dussen.
KG finishes with 3 wickets.
Malan and Elgar sprint up to get the pads on and get ready to bat. #ProteaFire #SAvENG pic.twitter.com/aApYY8izr4
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 4, 2020
प्रत्युत्तरात आफ्रिकेची सुरूवात चांगली झाली नाही. पीटर मालन ५, जुबैर हमजा ५ आणि फाफ डू प्लेसी १ धावांवर बाद झाल्याने आफ्रिकेची ३ बाद ४० अशी स्थिती झाली होती. त्यानंतर डीन एल्गरने ८८ आणि रैसी वैन डर डुसेन यांनी ६८ धावा करत संघाचा डाव सावरला आणि संघाची धावसंख्या २०० पर्यत नेली. त्यानंतर प्रीटोरियस ४ आणि केशव महाराज ४ धावा काढून झटपट बाद झाले. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने ३ तर स्टुअर्ट ब्राॅड आणि सँम करनने प्रत्येकी २ तर डोमनिक बेसने १ गडी बाद केला. केशव महाराज बाद होताच पंचानी दुस-या दिवसाचा खेळ थांबवला तेव्हा वरनाॅन फिलँडर १३ धावांवर खेळत होता.