रांजणगाव गणपती ( वार्ताहर ) – येथील महागणपती मंदिरात भाद्रपद महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो मात्र चालू वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महा गणपती मंदिरातील सर्व धार्मिक उत्सव बंद करण्यात आले आहेत. तरी ही या महोत्सवाच्या अनुशंगाने गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्याची पाहणी करण्यात आली.
रांजणगाव गणपती गावात आज पर्यंत कोरोनाचे ५० रुग्ण आढळून आले आहेत. यातील रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. माञ याञा काळात भाविक दर्शनाला येऊन गर्दी करु शकतात. या सर्व बाबींचा विचार करता महसूल प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरामध्ये गर्दी होणार नाही यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे या बंदोबस्ता साठी ५ पोलीस अधिकारी व ४० पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले.
रांजणगाव गणपती येथील मंदिर परिसरातील बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी महसुल व पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख , तहसीलदार लैला शेख , पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत , पोलीस उपनिरीक्षक प्रफ्फुल्ल कदम , मंडलाधिकारी संतोष नलावडे , कामगार तलाठी सतिष पलांडे , पोलीस पाटील सारिका तुषार पाचुंदकर , सामाजिक कार्यकर्ते नामदेव पाचुंदकर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.