– अमोल मतकर
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील एका शासकीय कार्यालयातील रंगेल कर्मचाऱ्याचे रंगीन चाळे अध्यापही सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार आज पुन्हा समोर आला आहे. त्या कर्मचाऱ्याने कार्यालयीन ग्रुपवर पुन्हा अश्लील फोटो टाकले असून त्याच्याकडून हा प्रकार चौथ्या वेळेस घडल्याने अद्यापही त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे कारवाई न झाल्याने कर्मचारीवर्गसह तालुक्यातील नागरिकांमध्ये संताप उमटत आहे.
आज सकाळी 7.45 ते 7.56 वाजता एका शासकीय विभागातील एका रंगेल कर्मचाऱ्याने “SDAO संगमनेर स्पोर्ट्स” या ग्रुपमध्ये एका महिलेचे सहा ते नऊ अश्लील फोटो आल्याने मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे या ग्रुप मध्ये संगमनेर, अकोले, राहाता, आणि कोपरगाव या तालुक्यातील 50 कर्मचारी असून 20 ते 25 महिला कर्मचारी असून तालुका अधिकारी यांच्यासह जिल्हा अधीक्षक ही याच ग्रुपमध्ये आहेत.
ग्रुपमध्ये फोटो आल्यानंतर एक ते दीड तासांमध्ये त्या बहाद्दराने सर्वांनाच ग्रुप मधून काढून टाकले आणि ते फोटो डिलीट करण्यात आले परंतु तोपर्यंत जवळपास सर्वांनीच ते फोटो पाहिले होते. दरम्यान त्या रंगेल कर्मचाऱ्याने त्या ग्रूपवर टाकलेले फोटो हे त्याच विभागातील महिला कर्मचाऱ्याचे असल्याचेही बोलले जात असून हा सगळा प्रकार संबधित महिलेला बदनाम करण्यासाठी आहे की ब्लॅकमेल करण्यासाठी आहे हे कळले नसले तरी त्या कर्मचाऱ्याने आतापर्यंत चार वेळा ही घोडचूक केली असल्याचे समजते.
विशेष म्हणजे तो कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच जागी ठान मांडून बसला असल्याने त्याचे अधिकारी आणि स्थानिक राजकीय वजन वाढल्याने दुसऱ्याला धमकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. याअगोदर असाच प्रकार घडला होता त्याची चौकशी अजूनही सुरूच आहे तर दुसरीकडे पुन्हा असाच प्रकार घडल्याने तो मनोरुग्ण समजावा की रंगेलदार? असा प्रश्न अनेक सुज्ञ नागरिकांना पडला आहे. आता तरी वरिष्ठ अधिकारी त्या रंगेलदार कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
त्या रंगेलदार कर्मचाऱ्यावर त्याच्याच पत्नीने संगमनेर शहर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. यामध्ये “तू घरातून निघून जा, तू आता म्हातारी झाली आहेस” असे म्हणत लाथा भुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा तिने उल्लेख केला असून यावरून त्या कर्मचाऱ्याची प्रतिमा उघड होते.