अबूजा – कोणत्याही हॉटेलमधील किंवा रेस्टॉरंटमधील कुकने स्वयंपाक करणे हा त्याच्या व्यवसायाचा भाग असला तरी अनेक कुक विक्रम करण्यासाठी सुद्धा आपली स्वयंपाकाची ही आवड जोपासत असतात नायजेरियातील एका महिला कुकने असाच एक अनोखा विक्रम केला. असून सलग 100 तासापेक्षा जास्त कालावधी तिने नॉनस्टॉप कुकिंग केले आहे हिल्डा बासी असे या महिला कुकचे नाव असून तिच्या विक्रमाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.
या आधीचा विक्रम 87 तास सलग कुकिंगसाठी नोंदवण्यात आला होता. 87 तासाचा हा विक्रम लारा टंडन या भारतीय कुकच्या नावावर होता हिल्डाने हा विक्रम करण्यासाठी गेल्या गुरुवारी दुपारी 3 वाजता कुकिंगला सुरुवात केली सोमवारी रात्री पावणेआठ वाजेपर्यंत तिचे हे कुकिंग सुरू होते. हा कालावधी 100 तासापेक्षा जास्त झाल्याने तिच्या या विक्रमाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.
शंभर तासांच्या कालावधीमध्ये तिने विविध प्रकारच्या रेसिपीज पूर्ण केला त्यामध्ये पारंपारिक नायजेरियन रेसिपीजप्रमाणेच विविध प्रकारचे सूप राईस अशा विविध प्रकारच्या रेसिपीज तिने करून दाखवल्या हा विक्रम चालू असताना तिला दर तासानंतर पाच मिनिटे विश्रांती घेण्याची किंवा बारा तास सलग काम केल्यानंतर एक तास विश्रांती घेण्याची सवलत देण्यात आली होती. तिने आपला विक्रम पूर्ण केल्यावर नायजेरियाचे अध्यक्ष महंमद बुहारी यांनीही ट्विट करून तिचे अभिनंदन केले आणि नायजेरियाच्या सांस्कृतिक इतिहासामधील ही महत्त्वाची गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.