मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण या प्रकरणी नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश आहेत.
नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना दरम्यान चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, नारायण राणे यांची पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘मी कोणताही गुन्हा केला नाही; माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही’ असं म्हणत आपली भूमिका मांडली आहे.
ते पुढे म्हणाले,नाशिकमध्ये भाजपाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. अशी दगडफेक करण्यात पुरुषार्ध नाही. असं म्हणत त्यांनी खोचक टोला लगावला आहे.
नारायण राणे Vs उद्धव ठाकरे संबंधित सर्व बातम्या –
‘मी कोणताही गुन्हा केला नाही; माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही’
“खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर या, तुमची औकात दाखवून देऊ”
शिवसेना ‘ऍक्शन मोड’मध्ये! तुफान दगडफेक करत नाशिकच्या भाजपा कार्यालयाची तोडफोड
नारायण राणे यांच्या अटकेसाठी पुणे पोलीस रवाना; मुख्यमंत्र्यांवरील टीका भोवणार
“नारायण राणे यांचे बाण वर्मी लागलेले दिसतायत”; भाजपच्या ‘या’ आमदाराचे राणेंना समर्थन
‘सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करु नका. आम्ही वाट पाहत आहोत’
मुंबईत शिवसेना आक्रमक; नारायण राणेंविरोधात ‘कोंबडी चोर’ उल्लेख करत बॅनरबाजी
video – ‘…मी असतो तर कानाखालीच चढवली असती’, राणेंची जीभ घसरली