“नारायण राणेंचा माज उतरवू, घरात घुसुन ‘त्यांचा’ हिशेब चुकता करू” : संजय गायकवाड

मुंबई :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याने राज्यात पूर्णपणे वातावरण ढवळून निघाले आहे. राणेंनी केलेल्या वक्तव्याविरोधात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक करण्यासाठी पुणे आणि नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत. दरम्यान, या सर्वात शिवसेना आणि राणे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून वर आला आहे.

नारायण राणेंचा माज उतरवू, त्यांच्या घरात घुसून शिवसैनिक काय असतो हे दाखवून देऊ. विरोधी पक्षाने केवळ भुंकण्यासाठी सोडलं आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याची भाषा करता, यापुढे अशी भाषा केली तर घरात घुसून तुम्हा हिसका दाखवू, असे  शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असे  नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.