मुंबई – बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याचा आगामी चित्रपट स्वतंत्र वीर सावरकरचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये रणदीप हुड्डा सावरकरांसारखा काळी टोपी आणि चष्मा घातलेल्या उत्कृष्ट वेशभूशेत दिसत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 139व्या जयंतीनिमित्त या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
RANDEEP HOODA: 'SWATANTRA VEER SAVARKAR' FIRST LOOK OUT NOW… On #VeerSavarkar's birth anniversary today, producers #AnandPandit, #SandeepSingh and #SamKhan unveil #FirstLook of #RandeepHooda, who portrays the title role in #SwatantraVeerSavarkar… Directed by #MaheshManjrekar. pic.twitter.com/uktFOwQqUZ
— taran adarsh (@taran_adarsh) May 28, 2022
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग आणि आनंद पंडित यांनी केली आहे, तर चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्रवीर सावरकर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक आज वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित करण्यात आला आहे, असे ट्विट त्यांनी केले.
चित्रपट निर्माते आनंद पंडित, संदीप सिंग आणि समखान यांनी रणदीप हुडाच्या फर्स्ट लुकचे अनावरण केले आहे. या चित्रपटात रणदीप वीर सावरकरांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी अभिनेता खूप मेहनत घेत असून सावरकरांच्या भूमिकेतील तो सर्वांना आवडेल यासाठी त्याने आपले वजनही कमी केले आहे. महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार बेटांवर वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे.