Swapnil Joshi And Prarthana Behere| अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री प्रार्थना 2015 साली रिलीज झालेल्या मितवा चित्रपटात पाहायला मिळाले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानंतर स्वप्नील आणि प्रार्थनाची जोडी पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या त्या गाण्याच्या शुटिंग दरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे
‘मितवा’ चित्रपटानंतर ‘बाई गं’ चित्रपटामध्येही ही जोडी दिसणार आहे. प्रार्थना बेहरेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “बाई गं!!!!! गाण्याची शुटिंग सुरू आहे. लवकरच चित्रपट रिलीज होईल.” असं कॅप्शन देत तिने एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. त्यांच्या गाण्याची शुटिंग एका समुद्र किनारी सुरू असल्याचे दिसत आहे. दोघेही या व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसत आहे. Swapnil Joshi And Prarthana Behere|
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये, स्वप्नीलने टी शर्ट, फ्लोरल प्रिंटेड जॅकेट, जीन्स तर प्रार्थनाने ब्लू कलरची फॅन्सी साडी वेअर केलेली दिसत आहे. दरम्यान, अभिनयासोबतच स्वप्नीलने आता निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची निर्मिती स्वप्नीलने केली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Swapnil Joshi And Prarthana Behere|
त्यासोबतच स्वप्नीलचा ‘बाई गं’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांनच्या भेटीस असून या चित्रपटातील गाणं शूट करण्यासाठी ‘मितवा’ जोडी एकत्रित आली आहे. या जोडीला पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.
हेही वाचा:
सुनेत्रा पवार यांचं शिक्षण, व्यवसाय, संपत्ती किती ? वाचा बायोडेटा