Swatantrya Veer Savarkar । Sharad Ponkshe : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट काल 22 मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणदीपसोबत अंकिता लोखंडे आणि अमित सियाल हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी (शुक्रवारी) केवळ 1.15 कोटी रुपयांचे अंदाजे कलेक्शन केले आहे.
मात्र, अंतिम डेटा जाहीर झाल्यानंतर ‘या’ आकड्यात थोडे बदल होऊ शकतात. सद्य:स्थितीत 1.15 कोटींचे संकलन चांगले म्हणता येणार नाही. मात्र, शुक्रवारी 1 कोटींहून अधिक कमाई करण्यात यश आले असले तरी शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे संकलनाचा आकडा वाढला असल्याचं सांगण्यात आलं आहे. । Swatantrya Veer Savarkar । Sharad Ponkshe
विनायक दामोदर सावरकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंग, रणदीप हुड्डा आणि योगेश राहर यांनी केली आहे तसेच रूपा पंडित, सॅम खान, अन्वर अली आणि पांचाली चक्रवर्ती यांनी या चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे. । Randeep Hooda
दरम्यान, हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी कोणती प्रतिक्रिया का दिली नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला. आता सिनेमावर अभिनेते शरद पोंक्षे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. । Swatantrya Veer Savarkar । Sharad Ponkshe
वीर सावरकर यांच्या भूमिकेतील रणदीप याचा फोटो पोस्ट करत अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, “प्रत्येकाने पहायला हवा.मी दुसऱ्या सिनेमात व्यस्त आहे. म्हणून मला अजून बघणं जमलं नाही.पुढील दोन दिवसात मी बघून एक छान व्हिडिओ करून प्रसारित करणार आहे. । Randeep Hooda
हे सांगण्याचं कारण खूप लोक मला विचारताहेत की तुम्ही चित्रपटाबद्दल काही का बोलला नाहीत तर सिनेमा अधिक बघावा आणि मग सविस्तर त्यावर बोलावं असं ठरवलेलं आहे. पुढील चार दिवसात माझा व्हिडिओ येईलच’. असं ते म्हणाले आहेत.
या चित्रपटात रणदीप हुड्डा विनायक दामोदर सावरकरांची भूमिका साकारताना दिसत आहे. मुख्य भूमिका करण्यासोबतच त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. यातून त्याने दिग्दर्शनाच्या जगातही प्रवेश केला आहे. या सिनेमासाठी अभिनेत्याने स्वतःच घर देखील विकलं असल्याचं सांगितलं आहे.
एका मुलाखतीत बोलताना, रणदीप म्हणाला की, “हा सिनेमा तयार करण्यासाठी मला कोणीही मदत केलेली नाही. या सिनेमासाठी मी माझं घर विकलं आहे. मी हा सिनेमा सावरकरांवर झालेला अन्याय दाखवण्यासाठी बनवला आहे’. असं तो म्हणाला. । Swatantrya Veer Savarkar । Sharad Ponkshe