अभिनेता रणबीर आणि दीपिका यांची चित्रपटातील केमेस्ट्री आजही चाहत्यांना खूप आवडते. रणबीर आणि दीपिका हे एकमेकांच्या प्रेमात होते मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झाले.अशात सोशल मीडियावर त्यांचे जुने व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये हे दोघे एकमेकांबाबत व्यक्त होतांना दिसत असतात.
रणबीरच्या जुन्या व्हायरल व्हिडिओमध्ये तो दीपिकाला ‘चिप मुलगी’ म्हणत आहे. हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एवढेच नाही तर रणबीरने दीपिकासाठी बरेच काही सांगितले आहे. रणबीर कपूरने व्हायरल व्हिडिओमध्ये म्हणाला आहे, ‘दीपिकाच्या आत एक मोठी चिप मुलगी आहे. तुम्ही तिच्याशी जसे वागलं तशी ती समोरच्याशी वागत असते. ती जशास तशी वागणारी मुलगी आहे.’ तो पुढे म्हणाला, ‘इम्तियाजलाही हे लव्ह आज कल दरम्यान कळले’
रणबीर कपूर वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास,तो शेवटचा संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘ॲनिमल’मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला होता. आता त्याच्याकडे सई पल्लवीसोबत नितेश तिवारीचा ‘रामायण’ आहे. रणबीरने आलिया भट्ट आणि विकी कौशलसोबत संजय लीला भन्साळीचा ‘लव्ह अँड वॉर’ देखील साइन केला आहे.दीपिकाच्या बाबतीत सांगायचे तर ती शेवटची हृतिक रोशनसोबत ‘फाइटर’मध्ये दिसली होती. अभिनेत्री आता अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘द इंटर्न’ आहे.