अयोध्या- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम जन्मभूमी-बाबरी मशीदचा वाद मिटला असून श्री रामजन्मभूमी येथे मंदिर उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. लॉकडाऊननंतर या जागेचे सपाटीकरण करण्यात आले होते. कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचं काम आता आणखी वेगाने सुरु आहे.
राममंदिराच्या उभारणीसाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केला होता. या ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील 80 टक्के काम पूर्ण झालं असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्येच राम मंदिराचे दरवाजे सामान्य जनतेसाठी कधी खुले केले जाणार आहेत.
दरम्यान, अश्यातच राम मांदिराबात एक मोठी माहिती समोर आली आहे. ‘रामलला’ मंदिरात विराजमान होण्याची रामभक्त मोठ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. श्री राम मंदिरात प्रतिष्ठापणेच्या तारीख जाहीर करण्यात आली आहेत.
आगामी वर्षात 15 ते 24 जानेवारीदरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी एका वृत्तवाहिनीला यासंबंधी माहिती दिली आहे.
राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले जाईल. तसेच प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातील. 24-25 जानेवारी 2024 पासून सर्वसामान्य भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे.