Ram Mandir Inauguration : 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामललाच्या अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अभिषेक झाल्यानंतर सर्वसामान्यांनाही येथे दर्शन घेता येणार आहे. राम मंदिर प्रवेशाबाबत काही नियम करण्यात आले आहेत, ज्यांची सर्वसामान्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर बंदी
राम मंदिरात प्रवेश करताना तुम्हाला तुमचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही. या गॅजेट्समध्ये मोबाईल, इअर फोन, रिमोट की आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय तुम्ही पर्स किंवा इतर कोणतीही बॅग आत नेऊ शकणार नाही.
याशिवाय राम मंदिरात येणाऱ्या पाहुण्यांना 22 जानेवारीला सकाळी 11 वाजेपूर्वी प्रवेश घ्यावा लागणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जर कोणी सुरक्षा कर्मचारी सोबत आला असेल तर त्यालाही बाहेरच राहावे लागणार आहे.
कोणताही ड्रेस कोड लागू नाही
ड्रेस कोडबद्दल बोलायचे झाल्यास, राम मंदिर ट्रस्टने कोणताही ड्रेस कोड लागू केलेला नाही, तथापि, तुम्ही भारतीय परंपरेनुसार कपडे परिधान करून राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहू शकता.
रामललाच्या अभिषेक कार्यक्रमात पुरुष धोतर, गमछा, कुर्ता-पायजमा आणि महिला सलवार सूट किंवा साडीमध्ये जाऊ शकतात, असे सुचवण्यात आले आहे.