रकुल प्रीत सिंह बॉलीवूड आणि साउथच्याही चित्रपटांत काम करते. 2014 मध्ये तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिचा हा पहिला चित्रपट यारीयां फारसा लक्षवेधी ठरला नाही.
View this post on Instagram
मात्र तिने त्याचवेळी साउथमध्येही डेब्यू केला. तिथे तिची चांगली ओळख निर्माण झाली आहे. आता तब्बल 4 वर्षांच्या गॅपने ती पुन्हा हिंदीत येते आहे. तिचे दोन चित्रपट पूर्ण झाले असून प्रदर्शनासाठी सज्ज आहेत, तर दोन चित्रपटांची शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.
View this post on Instagram
साउथ आणि हिंदी असे एकाच वेळी काम करताना भाषेची अडचण येत नाही का, असे विचारल्यावर रकुल म्हणते की ती भाषेचा विचार करत नाही. तुमच्याकडे प्रतिभा असेल तर कोणतीही अडचण येत नाही.
View this post on Instagram
कारण प्रतिभेला सीमारेषा नसते. मला बॉलीवूडमध्ये अजून बरेच काम करायचे आहे. व्यावसायिक चित्रपट करायचे आहे. भरपूर नाच- गाणी करायची आहेत.
View this post on Instagram
हल्ली करोनामुळे चित्रपटांना थिएटर मिळत नसल्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मचा बोलबाला आहे. त्याबाबत विचारल्यावर रकुल म्हणते की आमचे मोठ्या पडद्यावर प्रेम आहे. मात्र हल्ली त्याची अडचण आहे. ओटीटी आहे.
View this post on Instagram
प्रत्येक प्लॅटफॉर्मचे एक महत्व असते. तसे त्याचेही आहे. पूर्वी लोक मनोंजरनासाठी सिनेमागृहात येत होते. आता आम्ही त्यांच्या घरात पोहोचून त्यांचे मनारंजन करत आहोत.
View this post on Instagram
स्वत:च्या कामाबद्दल बोलताना ती म्हणाली की मी रात्री लवकर झोपते आणि सकाळी लवकर उठते. त्यामुळे मला कामाचे योग्य संतुलन साधता येते आहे. मुळातच मी वर्कोहोलीक आहे.
View this post on Instagram
तसेच चित्रपटसृष्टीत इनसाइडर आणि आउटसाइडर असे फार काही नसते. तुमची ओळख असेल तर तुम्हाला थोडी मदत होते. मात्र कोणाला स्वीकारायचे आणि कोणाला नाकारायचे हे शेवटी प्रेक्षकांच्या हातात असते.