नागपूर : नागपुरात काही भाज्या चिकनपेक्षाही महाग झाल्या आहेत. नागपुरात सध्या चिकनचा दर 200 रुपये किलो आहे. पण, मेथी, फरसबी, शेवगा, वाल या भाज्या किरकोळ बाजारात 250 रुपये किलो दराने विकल्या जात आहेत.
आवक कमी झाल्याने सध्या नागपूरच्या किरकोळ बाजारात चिकनपेक्षाही भाजीपाला महागल्याची स्थिती आहे. पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झालंय. त्यामुळे सर्वच भाज्यांच्या दरात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झालीये. याचा ग्राहकांच्या बजेटवर मोठा परिणाम होतोय.
नागपूरमध्ये आजपासून बाजार रात्री 8 पर्यंत खुले राहणार आहे. तर हॉटेल, रेस्टॉरंट रात्री 11 पर्यंत उघडे राहणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने नियमात शिथिलता देण्यात आली आहे. कोरोनाचे संकट टळले नसल्याने नागरिकांनी शिथिलता असली तरी काळजी घेण्याची गरज आहे.
भाज्या दर प्रति किलो
मेथी 250 रुपये किलो
फरसबी 250 रुपये किलो
वाल 250 रुपये किलो
शेवगा 250 रुपये किलो
फ्लावर 120 रुपये किलो
वांगी 80 रुपये किलो
टोमॅटो 50 रुपये किलो
कोथिंबीर 120 रुपये किलो
पत्ताकोबी 80 रुपये किलो
दोडका 120 रुपये किलो
भेंडी 120 रुपये किलो