मुंबई – राखी सावंतला कोण ओळखत नाही राखी अनेकदा तिच्या फ्लर्टीशियल, बोल्ड स्टाइल आणि अॅटिट्यूडमुळे चर्चेत असते, पण यावेळी राखीला नेमकं काय झालंय हे कळत नाही. तिला राग आला आणि राग येताच ती हातात फावडे घेऊन रस्त्यावर ऑटोरिक्षाच्या मागे धावत सुटली.पण हे सगळं तिने का केलं याच उत्तर मात्र मिळू शकलेलं नाही.
जिमच्या बाहेरील परिस्थिती पाहून चिडली
मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे तुटली असून घाणीचं साम्राज्य पसरायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा राखीने तिच्या जिमच्या बाहेर असेच काही पाहिले तेव्हा तिला राग आला. हातात फावडे घेऊन ती इकडे तिकडे पाहू लागली. तिला पाहून लोक थांबले तेव्हा राखीला आणखीच राग आला आणि ती हातातील फावड्यासकट रिक्षाच्या मागे धावली.
View this post on Instagram
आदिल सोबत आला नाही
या व्हिडिओमध्ये राखी सावंतसोबत तिचा प्रियकर आदिल दिसत नाही. आजकाल राखी कुठेही दिसली तरी आदिल तिच्यासोबत नक्कीच असतो. आदिल खानसोबत राखीची प्रेमकहाणी कशी सुरू झाली हे सध्या माहित नाही, परंतु असे वृत्त आहे की दोघेही लग्नाची योजना आखत आहेत आणि लवकरच लग्न करू शकतात. नुकतेच राखीने खुलासा केला होता की तिच्या आईलाही त्यांच्या नात्यात कोणतीही अडचण नाही. अशा परिस्थितीत ते आता एकमेकांना चांगले ओळखत आहेत, त्यानंतर ते लग्न करणार आहेत.