मुंबई – बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतीच ती रमजानच्या इफ्तार पार्टीत दिसली होती. आणि आता तिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये राखी सुप्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराची खिल्ली उडवताना दिसत आहे.
मलायका आरोराचा एक व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये मलायाकाला तिच्या चालण्यावरून चांगलचं ट्रोल करण्यात आले होते. इतकंच नाही तर तिचे खास मित्र गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांनीही मलायकाच्या चालण्याची आणि फोटोग्राफीच्या पोजची थट्टा केली होती. राखी सावंतने आता यावरूनच मलायकाची खिल्ली उडवली आहे.
मी मलायकाच्या स्टाईलची दिवाणी आहे. असं म्हणत राखीने मलायकाप्रमाणे वॉक केला आहे. ज्यावेळी अनेक मीडिया कॅमेरे राखीभोवती फिरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी कॅमेरामन देखील यावेळी राखीला मलायकाजी असा आवाज देताना दिसत आहेत.
View this post on Instagram
सोशल मीडियावर राखीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी राखीच्या या नव्या वॉकचे कौतुक केले आहे. ‘सेम टू सेम’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर दुसऱ्या एकाने वॉक कॉपी केला पण फिटनेसच काय ? असा सवाल राखीला विचारला आहे.