मुंबई – बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या फ्लर्टीशियल, बोल्ड स्टाइल आणि अॅटिट्यूडमुळे चर्चेत असते, पण यावेळी राखी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. राखी सावंत हिला प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राचे प्रायव्हेट फोटो व्हायरल केल्या प्रकणी अटक करण्यात आली होती.दिवसभर राखीची चौकशी केल्यानंतर तिला सोडून देण्यात आले. त्यानंतर बाहेर येताच राखीने घडलेल्या प्रकाराबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर राखी बाहेर येताच मीडियाने तिच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना राखी म्हणाली,”जय महाराष्ट्र, जय भारत, मी फक्त माझ्या आईला भेटायला रुग्णालयात आले आहे. मला डॉक्टरांचा फोन आला की माझ्या आईची प्रकृती गंभीर आहे” असं राखी यावेळी म्हणाली. “आईची प्रकृती ठिक नाही. मला चक्कर येत आहे, माझा बीपी लो झालाय, मी दिवसभर जेवणही केलेलं नाही” अशीही माहिती राखीने मीडियाशी बोलताना दिली.
शर्लिन चोप्राने राखी सावंत विरोधात दिली होती तक्रार
अंबोली पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत राखी सावंतला अटक केली होती. पोलिसांनी एफआयआर 883/2022 संबंधी राखी सावंतला अटक केली. सध्या शर्लिन चोप्राचे ट्विट करत राखीला अटक झाल्याची माहिती सर्वांसमोर आणली होती.
View this post on Instagram
शर्लिन चोप्रा ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 2012 मध्ये तिने ‘प्लेबॉय’ मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. एमटीव्ही स्पिल्ट्सविलाच्या सहाव्या सिझनचं तिने सूत्रसंचालन केलं. तिने बिग बॉसमध्येही भाग घेतला होता. तेव्हा पासून शर्लिन चर्चेत आहे.