मुंबई – बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. सोशल मीडियावर ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने ड्रामा करताना दिसते. राखीसोबत शनिवारी अशीच एक घटना घडली आहे, ज्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली.यावेळी राखीच्या ड्रायव्हरनेच तिला लुटल्याचे समजते याबाबत स्वतः अभिनेत्रीने माहिती दिली आहे.
राखी सावंतने पापाराझीशी बोलताना सांगितले की, तिचा ड्रायव्हर तिच्या गाडीची चावी घेऊन पळून गेला. यासोबतच त्याने राखीचा गोल्ड फोन आणि पैसे देखील चोरून नेल्याचे अभिनेत्रीने म्हंटले आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. घडलेल्या प्रकारामुळे राखी चांगलीच वैतागली आहे.
माझा ड्राइव्हर पप्पू यादवला मला चपलांचा हार घालायचा आहे. तो कुठं भेटला तर मला सांगा असं राखी सावंत पापाराझीशी बोलताना म्हणाली. तसेच यावेळी ड्रायव्हरनेर गोल्ड फोन,गाडीची चावी आणि काही पैसे देखील चोरून नेल्याचे यावेळी राखीने म्हंटले. तसेच आता मी कोणत्या ग्रहावर,प्लॅनेटवर जाऊ ? मी त्याला गरीब समजून नोकरी दिली मात्र तो माझ्यावरच उलटला असं राखी म्हणते.
View this post on Instagram
या सर्व प्रकारावर पोलीस तक्रार देखील करणार असल्याचे यावेळी राखीने स्पष्ट केले. राखीच्या या व्हिडिओवर युजर्स आता कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, मॅडम तो चंद्रावर गेला आहे. दुसऱ्याने लिहिले की, राखीने त्याला पगार दिला नसेल हे नक्की. तर, आणखी एकाने लिहिले ही खरोखर एक कॉमेडियन आहे.