मुंबई – राखी सावंतची आई जया सावंत यांचे निधन झाले आहे. राखीची आई जया सावंत गेल्या अनेक दिवसांपासून टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमरशी त्या झुंज देत होत्या. अखेर त्यांची आज उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. यानंतर राखी सावंतांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
अनेक दिवसांपासून राखी सावंत तिच्या आईला रुग्णालयात भेटायला जाताना दिसत होती. तिच्या आईच्या प्रकृतीसाठी चाहते सतत प्रार्थना करत होते. मात्र काल राखीच्या आईने अखेरचा श्वास घेतला. यानंतर राखी सावंतला फार दुःख झाले. यादरम्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये राखी सावंतचा आक्रोश पाहायला मिळतोय.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी जेव्हा राखी सावंत मराठी बिग बॉसमधून बाहेर पडली तेव्हा तिला तिच्या आईची अवस्था कळली. ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आणि थेट हॉस्पिटलमध्ये गेली. रुग्णालयातून राखी सावंतने लाईव्ह सेशन करून चाहत्यांना आईच्या तब्येतीची माहिती दिली होती.