राजनाथ सिंग आणि डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथं द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री डॉ. मार्क एस्पर यांच्यात बॅंकॉक इथे द्विपक्षीय चर्चा झाली.

संरक्षण आणि सुरक्षा, अर्थव्यवस्था, ऊर्जा, दहशतवाद विरोधी लढाई आदी क्षेत्रात द्विपक्षीय संबंध दृढ झाल्यामुळे सिंग यांनी समाधान व्यक्त केले. भारत- प्रशांत क्षेत्रातल्या मुद्यांबाबत अमेरिका आणि भारताचे एकमत होत आहे. या भागातील चीनचा विस्तार चिंताजनक आहे.

चीनचा आर्थिक प्रभावही चिंताजनकरितीने वाढत आहे, असे ते म्हणाले. हा भाग मुक्त आणि खुला असावा, या भागाची भरभराट व्हावी, आणि या भागाची सार्वभौमता आणि अखंडता टिकावी, असा भारताचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

आसियान हा भारत- प्रशांत संबंधातील केंद्रबिंदू असल्याचे ते म्हणाले. सागरी सुरक्षेत दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढीवर भर दिला जाणार आहे. पुढच्या महिन्यात वॉशिंग्टन इथे होणाऱ्या “2 + 2′ चर्चेत या भेटीचा फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन्ही देशांमध्ये दहशतवाद विरोध, सुरक्षा, अर्थकारण, उर्जा, आणि नागरिकांमधील थेट संवाद आदी क्षेत्रांमध्येही व्यापक सहकार्याबाबत चर्चा झाली असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.