इसिसशी लागेबांधे असणाऱ्या जर्मन महिलेला अटक

फ्रॅंकफर्ट: जर्मनीमधील एका महिलेला तुर्कीतून मायदेशात प्रत्यार्पण झाल्यानंतर लगेचच अटक करण्यात आली. तिचे लागेबांधे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या खतरनाक दहशतवादी संघटनेशी असल्याचा संशय आहे.
इसिसमध्ये दाखल होण्यासाठी पाश्‍चिमात्य देशांतून अनेकांनी इराक आणि सीरिया गाठले. नंतर त्यांनी तुर्कीत आश्रय घेतला. त्या संशयितांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया तुर्कीने सुरू केली आहे.

दोन जर्मन महिलांनाही तुर्कीतून बाहेर घालवण्यात आले. त्यातील नसीम ए. नावाच्या महिलेला फ्रॅंकफर्ट विमानतळावर उतरताच अटक करण्यात आली. ती 2014 मध्ये सीरियाला गेली. तिथे तिने इसिसच्या एका दहशतवाद्याबरोबर लग्न केले. नंतर ती इराकमध्ये राहू लागली. नंतर नसीम तिच्या दहशतवादी पतीसह पुन्हा सीरियाला गेली. तिथे तिला चालू वर्षाच्या प्रारंभी सुरक्षा दलांनी अटक केली. आता तिची पाठवणी जर्मनीला करण्यात आली. तिच्याकडे जर्मनीचे नागरिकत्व असल्याचे समजते. तिच्या चौकशीतून इसिसच्या विविध कारवायांवर प्रकाश पडण्याची जर्मन सुरक्षा आणि तपास यंत्रणांना आशा आहे. संबंधित महिलेच्या दोन दिवस आधीच तुर्कीने एका जर्मन पुरूषाचेही प्रत्यार्पण केले. इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यालाही अटक करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)