मुंबई – कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या बातम्या वाचून अथवा पाहून जर तुमच्या मनामध्ये भीतीचे ढग दाटून आले असतील तर ही ‘गुड न्यूज’ तुमच्यासाठीच आहे. राज्यातील कोरोनाची लागण झालेले ३४ रुग्ण सध्या ठणठणीत झाले असून याबाबतची ‘गुड न्यूज’ खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
देशभरामध्ये सध्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अशातच राज्यातील ३४ कोरोनाग्रस्त ठणठणीत झाल्याची बातमी निश्चितच सुखावणारी आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शहरनिहाय कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जाहीर केली असून या आकडेवारीनुसार मुंबई 14, पुणे 15, नागपूर 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03 असे 34 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. राज्यामध्ये सध्या १५५ कोरोनाग्रस्त उपचार घेत आहेत.
कोरोनाग्रस्त बरे होत असल्याची बातमी नक्कीच सकारात्मक असली तरी आपण सर्वांनी कोरोनाला रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ही लढाई घरात बसूनच जिंकू शकू.
राज्यातील मुंबई 14, पुणे 15, नागपूर 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03 असे 34 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.
सक्रिय प्रकरणे – 155#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक— Rajesh Tope (@rajeshtope11) March 29, 2020
Sir definitely we will won the battle against corona but please tell to the foolish people who are making crowd for vegetables. Specifically mumbaikar.