Rajasthan school in Surya namaskar । भारतीय जनता पक्षाचे नवीन सरकार राजस्थानमध्ये सत्तेत आल्यानंतर राज्यातील सर्व शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य करण्यात आले आहेत. याबाबत मुस्लिम संघटनांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
त्यामुळे मुस्लिम संघटनांनी सूर्यनमस्काराच्या विरोधात राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी उच्च न्यायालयात उद्या, बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. Rajasthan school in Surya namaskar
यासंदर्भात सोमवारी जमियत उलेमा हिंद संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने बैठक घेऊन मुस्लिम समाजाला सूर्यनमस्कार कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.
यासोबतच जमियतसह इतर मुस्लिम संघटनांनी राजस्थान उच्च न्यायालयात १५ फेब्रुवारीचा सामुदायिक सूर्यनमस्कारांचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे.
१४ फेब्रुवारी रोजी या याचिकेवर सुनावणी । Rajasthan school in Surya namaskar
तसेच सर्व शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी संयुक्त याचिका दाखल केली आहे. आता राजस्थान उच्च न्यायालय बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी या याचिकेवर सुनावणी करणार आहे.
जमियत उलेमा-ए-हिंद राजस्थानच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सोमवारी यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला. सरकार धार्मिक बाबींमध्ये अवाजवी हस्तक्षेप करततासून संविधानात दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करत असल्याचे जमियतने म्हटले आहे.
जमियतचे सरचिटणीस मौलाना अब्दुल वाहिद खत्री यांनी मुस्लिम समुदायाला १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सूर्य सप्तमीच्या दिवशी मुलांना शाळेत पाठवण्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि अनिवार्य कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
निवडणुका जिंकण्यासाठी आणि हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे, असा आरोपही जमियतने केला आहे.