पुणे – शहर आणि उपनगरांच्या काही भागांत पूर्वमोसमी पावसाने रविवारी हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. येत्या 24 तासांत शहरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
राज्यात सर्वत्र पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर तर आकाशात ढग दाटून आले होते. सायंकाळच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या. यामुळे शहरातील तापमान हे 38 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते.